अध्यक्षांचे मनोगत….

जय गजानन

मी एक कार्यकर्ता असल्याने गेली काही वर्षे मी रत्नागिरी तालुक्यातील लोकांच्या जीवनातील एक महत्वाचा घटक म्हणून सतत वावरत आहे.कामासाठी रोज वेगवेगळ्या गावात विविध प्रकारची माणसे भेटत असतात.मला माझ्याही नकळत ,त्यांच्या वागण्याची पद्धत,बोलण्याची आणि प्रतिक्रिया देण्याची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विचार करण्याची पद्धती याचं निरीक्षण करण्याची सवय मला लागली.त्यानंतर राष्ट्रवादी युवक अध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर मी कित्येकदा पूर्ण महाराष्ट्र फिरलो.तिथेही सहवासात आलेल्या माणसांच असं अंर्तबाह्य निरीक्षण करण्याची सवय कायम राहिली आणि मग विचार करता करता एक गोष्ट अचानकपणे जाणवली आणि ती म्हणजे असंख्य अडचणी असल्याने असेल कदाचीत पण कोकणी माणसांच्या विचारामध्ये एक चिवटपणा आहे,एखादी गोष्ट साध्य करण्याची जिद्द आणि प्रचंड ताकद आहे.

माझ्या वयामुळे असेल कदाचित,पण वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने माझ्याभोवती युवा वर्ग जमा होत गेला आणि यातुनच एकांकिका स्पर्धा,सार्वजनिक दहिहंडी,बहर यासारखे कार्यक्रम उभे राहिले.असं असलं तरी मला या सगळ्यात काही तरी अपूर्ण आहे असं वाट्त राहिलं.मुला-मुलींच्या या उत्साहाला,बुद्धीला आणि कल्पकतेला एक सार्वजनिक आणि कायमस्वरुपी व्यासपीठ मिळायला हवं हे सारखं वाटत होतं.या विचारांनी बुद्धीला भरपुर ताण दिल्यानंतर अचनक बुद्धीची देवता प्रसन्न झाली आणि वि्चार सुचला.गणेशोत्सवाच्या माध्यमातुन एक सामाजिक,सार्वजनिक व्यासपीठ निर्माण करायचं.त्याचं स्वरुप एका मंडळापुरतं किंवा काही मंड्ळींपुरत संकुचित न राहता ते सर्व समावेशक असायला हवं.या अणि अशा विचारातूनच सहा वर्षापुर्वी अवतीर्ण झाला ,”श्री रत्नागिरीचा राजा,अवघ्या रत्नागिरीचा राजा,लाडका माझा.”

मी स्वतः कार्यकारी ते मंत्रीपदापर्यंतचा प्रवास हा रत्नागिरीतील जनतेच्या विश्वासावर आणि श्री रत्नागिरीचा राजा च्या आशिर्वादाने केला आहे याची मला पूर्ण जाणिव आहे.

“श्री रत्नागिरीचा राजा.” च्या साक्षीने आणि आशिर्वादाने रत्नागिरी तालुक्यातील तरुणांनी या माध्यमाद्वारे एकत्र येऊन आपल्या समाजाकरिता,गावाकरीता,देशाकरीता उत्तम काम करावे.त्यांच्या बुद्धीला आणि शक्तीला योग्य वाव मिळावा हीच त्या गजाननाच्या चरणी प्रार्थना

धन्यवाद.

आपला नम्र
उदय सामंत

Date

August 30, 2013